July 22, 2024
Home » खासदार जलील यांच्या उपोषणस्थळी रात्री झाली बिर्याणी दावत

छत्रपती संभाजीनगर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

औरंगाबाद शहराचे नामकरण छ्त्रपती संभाजीनगर झाल्याच्या निषेधार्थ खासदार जलील यांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपोषण स्थळी रात्री चक्क बिर्याणीच्या दावत देण्यात येत आहेत. त्यामुळे या उपोषणावर आता प्रश्नचिन्ह उठवण्यात येत आहे.

दरम्यान, जलील यांचे हे उपोषण आधीच वादात सापडले असताना आता पुन्हा बिर्याणी दावतने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यापूर्वी उपोषणाच्या पहिल्या दिवशी औरंगजेबाचा फोटो उपोषणस्थळी झळकल्याने सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. आता या बिर्याणी दावतने पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. खासदार जलील यांनी याबाबत अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
………………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!