July 26, 2024
Home » तो आलमगीर औरंगजेब चौक हटवला…

छत्रपती संभाजीनगर: न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच चिकलठाणा येथील विमानतळ समोरील दुभाजकावर अज्ञात व्यक्तींनी आलमगीर औरंगजेब चौक नावाने चौक उभारला.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी मनपा प्रशासक व पोलीस प्रशासनास संपर्क करून तात्काळ चौकातील नाव न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करून सदर चौकवरील आलमगीर औरंगजेब चौक असे नाव हटवले.

शहराच्या नावातून औरंगजेबाचे नाव हटले आहे, आता काही लोकांच्या डोक्यातून देखील ते निघावे अशी इच्छा आहे. प्रसंगावधान दाखवत महाराष्ट्र सैनिक महेंद्र खिरे व सागर राजपूत यांनी तातडीने चौकाबाबत माहिती दिल्याने हे शक्य झाले. यातून आमचे महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर आहेत, त्यामुळे यापुढे कुणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया आशिष सुरडकर यांनी दिली.
……………………………………………………..

न्यूज मराठवाडा WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!