July 23, 2024
Home » राज्यस्तरीय स्पर्धेत हतनूर फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश.

कन्नड; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :  मुळा एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, सोनई जि. अहमदनगर यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय इंटरकॉलेजिएट इनोव्हेटिव्ह आयडियाज -मॉडेल/पोस्टर स्पर्धेत हतनूर (ता.कन्नड) येथील राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमधील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग सादरीकरण स्पर्धेत रोहिणी कवार व रोहिणी मिश्रा यांनी म्युकोस्पिट बॉक्सच्या नाविन्यपूर्ण मॉडेलसाठी प्रथम पारितोषिक पटकावून यश मिळवले. याप्रसंगी प्रा. डॉ. गजानन वैष्णव, यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, औरंगाबाद व प्राचार्य डॉ. व्ही.के.देशमुख, एम.ई.एस. कॉलेज ऑफ फार्मसी सोनई. यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या स्पर्धेत महाराष्ट्रातील फार्मसी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसीच्या विजेत्या विद्यार्थीनींनी महाविद्यालयातील बी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. सुरेश वाघमारे व प्रा. अमोल दरवडे, प्रा. जितेन्द्र ढोणे यांचे मार्गदर्शन मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिव अर्जुन पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. खणगे व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!