July 25, 2024
Home » डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ सांभाळकर व प्रसिध्दी प्रमुखपदी डॉ सलामपुरे

वाळूज महानगर; न्यूज मारठवडा वृत्तसेवा :
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, दिल्ली संलग्नित डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी दागडोजिराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ संजय सांभाळकर यांची तर प्रसिध्दी प्रमुखपदी डॉ भरतसिंग सलामपुरे आणि विभागीय प्रकोष्ट प्रमुख म्हणून डॉ संदीप जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दि. 3 मार्च 2023 रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत विभागीय अध्यक्ष प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली यावेळी संघटनेचे महासचिव प्रो डॉ सत्यप्रेम घुमरे, विभागीय महिला अध्यक्षा डॉ महानंदा दळवी, राज्य सदस्य प्राचार्य डॉ सुहास मोराले, डॉ सुशील सूर्यवंशी, डॉ कल्याणकर, डॉ निलेश देगावकर, डॉ नितीन मालेगावकर यांची उपस्थिती होती. डॉ सांभाळकर हे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, संशोधक मार्गदर्शक, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक आहेत. सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील लढाऊ व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!