July 18, 2024
Home » वाळूज उद्योगनगरीत कंपनीला आग; दीड कोटींचे साहित्य जळुन खाक…

वाळूज महानगर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : 

वाळूज एमआयडीसी मधील  अनिल पॅकेजिक या बॉक्स बनविणाºया कंपनीला शुक्रवार (दि.३) सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आग लागली होती. या आगीत कंपनीतील मशनरी, तयार बॉक्स व रॉ-मटेरियल्स जळून भस्मसात झाले असून जवळपास दिड कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


रामचंद्र नामदेव गवारे (रा.सिडको वाळूजमहानगर-१) यांची वाळूज एमआयडीसीत अनिल पॅकेजिंक (प्लॉट नं.जी.३९/७/१) या नावाची कोरोगेटेड बॉक्स तयार करण्याची कंपनी आहे. गुरुवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास या कंपनीला किरकोळ आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठुन जवळपास एक तासात आग आटोक्यात आणली होती. आग विझल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास या कंपनीला पुन्हा आग लागल्याने सुरक्षारक्षक पठारे यांनी कंपनी मालक रामचंद्र गवारे यांच्याशी संपर्क साधुन कंपनीला आग लागल्याची माहिती दिली. या माहितीनंतर कंपनीमालक गवारे यांनी घटनास्थळ गाठुन या आगीची माहिती वाळूज व मनपा अग्नीशमन विभागाला दिली. दरम्यान, कंपनीतील बॉक्स व रॉ-मटेरियलने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. यावेळी वाळूज अग्नीशमन विभाग व मनपाच्या दोन बंबानी घटनास्थळी गाठुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीतील तयार झालेले बॉक्स व रॉ-मटेरियलमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने अग्नीशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तसेच जवळपास १० खाजगी टँकर मागवून दुपारी १२ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरले. ही आग विझविण्यासाठी वाळूज अग्नीशमन अधिकारी पी.के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली के.टी.सुर्यवंशी, अशोक हातवटे, एस.बी.शेंगडे, वाय.डी.काळे, एस.डी.उकरे, मनपा अग्नीशमन विभागाचे आर.के.सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली  अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, विक्रम भुईगळ, सचिन शिंदे, इरफान पठाण, अक्षय नागरे, परेश दुधे, मयुर कुमावत, चालक आकाश हुसे, शंकर दुधे आदींनी परिश्रम घेतले.

शार्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज; दिड कोटीचे नुकसान
या विषयी कंपनीमालक रामचंद्र गवारे म्हणाले की, शार्ट सर्किटमुळे कंपनीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कंपनीतील लाखो रुपये किमंतीच्या १७ मशनरी, तयार झालेले कोरोगेटेड बॉक्स, रॉ-मटेरियल्स, फर्निचर, वायरिंग आदी आगीत भस्मसात झाले आहेत. या आगीच्या घटनेत जवळपास दिड कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे कंपनीमालक गवारे यांनी सांगितले.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!