July 23, 2024
Home » अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 3 वाहने जप्त

कन्नड; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :  

कन्नड येथे दि. ३ मार्च २०२३  रोजी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक कारवाई दरम्यान तहसिल कार्यालय कन्नड च्या पथकाने मौजा कन्नड शिवारात अवैध मुरुम वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर MH 20 AY 4482 आणि अवैध वाळू वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर MH 20 FG 0983 जप्त केले आले.

सदर 2 ट्रॅक्टर तहसील कार्यालय कन्नड येथे लावण्यात आले आहे. याच बरोबर कन्नड मधे परवानगी पेक्षा अतिरिक्त वाळू वाहतूक करणारे 1 ट्रक  जप्त करून पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण येथे लावण्यात आले आहे. सदर कारवाई ही मा. जिल्हाधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, मा. उपविभागीय अधिकारी श्री जनार्दन विधाते आणि मा. तहसीलदार श्री संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार श्रीमती मोनाली सोनवणे, तलाठी श्री बी जी घटे, कोतवाल बाळू चव्हाण यांनी केली आहे.  तालुक्यामध्ये अवैध वाळू, मुरूम, ई गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना  निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना माती, मुरूम ई गौण खनिजाची आवश्यकता असल्यास तहसील कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी असे आवाहन  तहसिलदार कन्नड श्री संजय वारकड यांनी केले.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!