July 22, 2024
Home » व्यापाऱ्याला मारहाण करून रत्यात कार अडवून २७ लाख रुपये लुटले,
  • सोलापूर – धुळे महामार्गावरील घटना

वाळूज महानगर, न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी कार अडवून व्यापाऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण करीत २७ लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी (दि.२०) रात्री आठ वाजेच्या सुमारास सोलापूर – धुळे महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळ घडली.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ मनोहर तायडे (रा. देवळी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर) व त्यांचा कार चालक अनिल भुसारे हे सोमवारी (दि.२०) रात्री औरंगाबाद येथून कार ( एम एच २० सी एस -३९१५) ने घरी देवळी येथे सोलापूर – धुळे महामार्गावरून जात होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते मुंबई – नागपूर महामार्गकडे जाण्यासाठी करोडी येथील उड्डाण पुलावरून वळण घेत असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी तायडे यांच्या कार समोर दुचाकी आडवी लावून तायडे यांना लाकडी दांड्या ने मारहाण करून २७ लाख रुपये असलेली बाग हिसकावून भामटे लाल रंगाच्या दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान घटनेची माहीत मिळताचपोलीस उपायुक्त दीपक गिरे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगर, द.पोलीस निरीक्षक गीते, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, सचिन वायाळ, पोहेकॉ. राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे सुरज अग्रवाल, आयुब पठाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!