July 26, 2024
Home » लग्नामधून अहेराचा डब्बा चोरट्याने लांबवला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद …

वाळूज महानगर : न्यूज मराठवाडा वृत्तसेवा – वाळूज परिसरातील ए. एस क्लब येथे सुरु असलेल्या लग्नमध्ये एका अल्पवयीन मुलाने अहेराचा डब्बा लांबवल्याची घटना आज दि १० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.ही घटना सिसिटीव्ही कॅमरामध्ये कैद झाली आहे.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत ए एस क्लब येथे आज दुपारी जैस्वाल कुटुंबीयांचे लग्न समारंभामध्ये एका मुलाने लग्नाची फेरे सुरु होते. ह्या संधीचा फायदा घेत एका १२ ते १४ वर्षाच्या मुलाने अहेराचा डब्बा लांबविला. डब्यामध्ये २० ते २५ हजार रू असल्याचे तेथील नातेवाईकांनी सांगितले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कॅमरामध्ये एक मुलगा डब्बा घेऊन जातांना दिसत आहे. या घटनेची मनोज बन्सीलाल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात अली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!