July 22, 2024
Home » शाळकरी मुलांमध्ये राडा, पेना ऐवजी विद्यार्थ्यांच्या हाती लोखंडी रॉड, तिघांवर गुन्हा दाखल

वाळूज महानगर : वादातून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याची घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बजाजनगर मधील आर एल सेक्टरमध्ये घडली.
या भांडणाचा व्हीडीओदेखील व्हायरल झाला असून मुलांनी पेनऐवजी हाती लोखंडी रॉड घेतल्याचे दिसत आहे. यावरून शिक्षणासाठी जाणारी मुल गुंड प्रवृत्तीकडे वळत आहेत का हा पालकांना विचार करायला लावणारी गंभीर बाब आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाजनगरमधील आर एल सेक्टरमध्ये किरकोळ वादावरून शाळकरी मुलांमध्ये जोरदार भांडण झाले, यामध्ये १७ वर्षीय सौरभ ( नाव बदलले आहे ) गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान सौरभ हा जयभवानी चौक येथे त्याच्या भावाकडे जात होता. त्यावेळी भगतसिंग शाळेच्या पाठीमागे काहीमुले जमलेले होते. त्यातील तीन मुलांनी सौरभला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व सिमेटच्या गट्टु ने सौरभच्या डोक्यात मारुन जखमी केले. दरम्यान मदतीसाठी आरडाओरड केल्याने सौरभचे मित्र त्याच्या मदतीसाठी धावुन आलेे. त्यानंतर मारहाण करणारे मुले पळुन गेले. घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सौरभला घाटी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

पालकांना मुलांवर लक्ष देण्याची गरज

बजाजनगरमध्ये शाळकरी मुलांमध्ये नेहमी वाद होत असतात, परंतु किरकोळ वादाचे रुपांतर मोठ्या घटनांमध्येही होऊ शकतात, त्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांवर, त्यांच्या वागण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!