July 26, 2024
Home » अपंग व्यक्तीची बसमध्ये जागेसाठी जीवघेणी कसरत

प्रशासनाची उदासीनता : बसमधील अपंगांच्या राखीव जागांवर इतर प्रवाश्यांचाच कब्जा..

औरंगाबाद : बस स्थानकावर बस आल्यानंतर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी वेगवेगळ्या शक्कल लढवताना नेहमी दिसतात परंतु आता अपंग प्रवाशांना सुद्धा बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. बसमधील अपंगांसाठी असलेल्या राखीव जागांवर इतर प्रवाशीच कब्जा करत असल्याने अपंगांनाही बसण्यासाठी जागा मिळविण्यासाठी जीवघेणी कसरत लागत असल्याचे विदारक चित्र औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर पाहावयास मिळाले. औरंगाबाद ते पैठण बस मध्ये जागा मिळवण्यासाठी एक अपंग व्यक्ती चक्क बसच्या खिडकीतून चढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


महामंडळाच्या बस मध्ये अपंग व्यक्तींसाठी राखीव जागा असतात. परंतु, सध्या या राखीव जागा केवळ नावालाच असल्याचे दिसतंय. कारण अपंगांसाठी असलेल्या या राखीव जागेवर सर्वसामान्य प्रवासी कब्जा करतात. याकडे महामंडळही अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. इतर प्रवाश्यांच्या घुसखोरीमुळे अपंग व्यक्तींना बसण्यासाठी बसमध्ये जागाच मिळत नाही. शिवाय कुणी दया मायाही दाखवत नाही. परिणामी अपंगांनाही उभे राहवून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बसमध्ये जागा मिळविण्यासाठी बऱ्याचदा अपंग व्यक्तींनाही धडपड करावी लागते. अपंगांची ही अवहेलना थांबविण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!