July 21, 2024
Home » अडीच महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेल्या २१ वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, बजाजनगरातील घटना

वाळूज महानगर : एका २१ वर्षीय नवविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास बजाजनगरात उघडकीस आली आहे. 

अंजली बिरेंद्रसिंग गौतम (२१ रा. कानपुर, उत्तरप्रदेश, ह.मु.बजाजनगर) या तरुणीचे वडील गौतम बिरेंद्रसिंग गौतम यांचे ४ वर्षापुर्वीच निधन झाले असून ती बाजाजनगरात आई गिता गौतम हिच्या सोबत रहात होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंजली हिने दहावीनंतर परिसरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करुन आईला हातभार लावत होती. काही दिवसापुर्वी अंजली हिची रोहित कारभारी आव्हाड (२२, रा.बजाजनगर) या तरुणासोबत मैत्री झाली होती. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर अंजली व रोहित यांनी लग्न करुन सोबत राहण्याचा निर्णय घेतला. या प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबियाकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने रोहित याने अंजली हिस पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे पळवून नेले. या नंतर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी हिंदु धर्म वैद्यीक पद्धतीने दोघांनी लग्न केले. लग्न केल्यानंतर काही दिवसानी रोहित व अंजली हे दोघे वाळूज एमआयडीसीत परत आले. प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवसात रोहित व अजंली यांच्यात वाद सुरु झाले. अंजली हिचा पती व सासरकडील मंडळीत कुरबुरी सुरु झाल्यानंतर अंजली हिने या प्रकाराची माहिती आई गिता गौतम हिला दिली होती. सासरकडील मंडळीकडून त्रास दिला जात असल्याने अंजली व तिच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठुन पती व सासरच्या मंडळीची तक्रार केली होती. यानंतर अंजली ही सासरी न जाता बजाजनगरात आई गिता हिच्याकडे राहत होती. सोमवारी सकाळी अंजली हिची आई गिता या कंपनीत कामासाठी गेल्यातर अंजली ही घरी एकटीच होती. कंपनीत गेल्यानंतर गिता यांनी अजंली हिच्या मोबाईलवर सतत संपर्क करुनही ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर गिताबाई यांनी शेजाऱ्यांना संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात डोकावुन पाहिले असता अंजली हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. अंजली ने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गिता गौतम ह्या कंपनीतुन घरी आल्या असता त्यांना मुलगी अंजली ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. एकुलत्या एक मुलीला या अवस्थेत पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंजलीला बेशुद्धावस्थेत खाली उतरवून शासकीय रुग्णालयात (घाटीत) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अंजलीला मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहेत.


पती व सासरच्या मंडळींवर कारवाईची मागणी …
अंजलीने केलेले लग्न तिच्या पतीच्या घरच्यांना मान्य नव्हते. लग्न झाल्यापासून तिच्या सासरच्या मंडळींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिचा पती रोहितही घरच्यांचे एकूण पत्नी अंजलीला त्रास देऊ लागला. चार-पाच दिवसांपूर्वी अंजलीला मारहाण केली. पती रोहित व सासरच्या मंडळीच्या छळामुळे अंजलीने आत्महत्या केली. असा आरोप करत मयत अंजलीची आई गिता गौतम यांनी अंजलीचा पतीसह सासरच्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!