July 18, 2024
Home » वाळूज एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई ; २४ लाख ७७ हजारांचा गुटखा जप्त

वाळूज महानगर : शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु वाहतूक करणाऱ्या एका आरोपीसह २४ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल वाळूज एमआयडीसी पोलिस व अन्न-औषध विभागाने दि २८ रोजी सजापुर येथून जप्त करुन सयुक्त कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना अवैध गुटखा वाहतूकीची गुप्त माहिती मिळताच,पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने राजस्थान धाब्याजवळ, धुळे-सोलापूर हायवे, साजापूर, ता. जि. औरंगाबाद येथे उभी असलेला टाटा टॅम्पो क्र. डीडी ०१ सी ९५५१ या टेम्पोवर छापा मारला असता यात गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल पोलिसांना मिळूण आला. त्याबाबत अन्न औषधी निरीक्षक यांच्या मदतीने जप्ती पंचनामा करून गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु व ११ लाख रू. किं.चा टाटा टेम्पो असा एकूण २४ लाख ७७ हजार रू. मुद्देमाल जप्त करुन टेम्पो चालक दत्ता आनंदराव मंडाळ, वय-२७, रा. मानेपूरी, ता. घनसावंगी, जि. जालना. ह. मु. नरोली, ता.जि. सिल्वासा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी अन्न-औषध निरीक्षक सुलक्षणा त्रिंबकराव जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता सर, मा. पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तसेच विशेष तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक चेतन ओगले, विनोद नितनवरे, पंकज साळवे, सुरेश कचे, यशवंत गोबाडे, सुरजकुमार अग्रवाल, यांनी केली आहे.

————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!