July 26, 2024
Home » खुनातील फरार आरोपी, तीन वर्षानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून अटक

न्यूज मराठवाडा

वाळूज महानगर : तीन वर्षांपूर्वी कंपनीतील सुपरवायझरच्या डोक्यात फावडे मारून खून करून पसार झालेल्या आरोपीच्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी दि. २३ फुलंब्री येथून मुसक्या आवळल्या. सोमेश सुधाकर ईधाटे (वय २७, रा. शिरोडी खुर्द ता. फुलंब्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


वाळूज औद्योगिक वसाहतीतील श्री इंजिनियरिंग कंपनीत २४ जानेवारी २०१९ साली सेकंड शिफ्टमध्ये जगदीश प्रल्हाद भराड, सुपरवायझर गोपाल विक्रम काळे, मुकेश साळुंके, (सुपरवायझर) आणि कामगार विष्णु ढोके, सुरेश ईधाटे असे चौघेजण काम करत होते. दरम्यान रात्री साडे अकराच्या सुमारास कामगार सोमेश सुधाकर ईधाटे हा कंपनीमध्ये आला. त्यामुळे सुपरवायझर मुकेश सांळुके हे सोमेश ईधाटेला म्हणाले की तु इथे काय काम, तु कशा करिता आला. त्यानंतर सोमेश याने काही एक प्रतिक्रिया न देता थोडा वेळ शांत बसुन राहीला व कंपनीच्या गेट जवळ गेला. त्यानंतर थोड्याच वेळात मोहन आवचर हा कंपनीचा कामगार आम्ही काम करित असलेल्या ठिकाणी आला व कंपनीचे सुपरवायझर मुकेश सोळंके यांना हातवारे करुन गेटवर लवकर चला असे म्हणत होता. ते सर्व कंपनीच्या गेट जवळ गेले. त्यावेळी कंपनी कामगार मोहन आवचार यांनी जवळच पडलेली प्लास्टीकटची नळी सोमेश ईघाटेच्या पाठीत मारली. त्यामुळे सोमेशला त्याचा राग आला. त्यानंतर त्याने जवळ पडलेले लोखंडी दांडा असलेले फावडे उचलुन मोहनवर मारणेसाठी उगारले. मात्र मोहन आवचार तेथुन कंपनीत पळाले. त्याच वेळी सोमेश ईधाटे याने तेथे उभे असलेले जगदीश भराड यांच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारले. दरम्यान जगदीश भराड जागीच खाली पडले. त्यानंतर सोमेश ईधाटे याने जगदीश भराड खाली पडल्यानंतर ही त्यांच्या डोक्यावर व तोंडावर फावड्याने मारले. जगदीश भराड याच्या डोक्यात व चेह-यावर गंभीर मार लागल्यामुळे ते रक्ताचे थारोळ्यात पडले. त्यानंतर सोमेश ईघाटे तेथून पळुन गेला. याप्रकरणी गोपाल विक्रम काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तीन वर्षांपासून पसार असलेला सोमेश ईधाटे गावी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार राहूल बंगाळे यांनी सापळा रचून सोमेश ईधाटे याला फुलंब्री तालुक्यातील शिरोडी येथून अटक केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!