July 23, 2024
Home » मोहटादेवी चौकातील तीन दुकाने फोडली

वाळूज महानगर :बजाजनगरातील गजबजलेल्या मोहटादेवी चौक परिसरात असलेल्या तीन कपड्यांचे दुकाने अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीला फोडल्याची घटना दि २१ रोजी सकाळी उघडकीस अली. यातील दोन दुकानामधून अंदाजे १० हजार तर अजुन एक दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

विठ्ठल दगडू पवार, भागवत दगडू पवार, रूपाली सोमनाथ सुसर ह्या दिघा बहीण- भावाचे मोहटादेवी चौकामध्ये भाड्याने शिव कलेक्शन, शिवालय रेडीमेड आणि ओम कलेक्शन असे तीन कपड्यांचे दुकान आहे. दि २० रोजी रात्री ९ वाजता दुकाने बंद करुन तिघेही घरी गेले. सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान दुकान मालक संजय राऊत यांना शटर उचकलेल दिसले त्यांनी समोर चहाची हॉटेल असलेल्या माधव धनोरे यांना सांगितले त्यांनी विठ्ठल पवार यांना फोन करुन माहिती दिली. विठ्ठल पवार यांच्या शिव कलेक्शन या दुकानामधून गल्ल्यातील अंदाजे ५ हजार रुपये तर भागवत पवार यांच्या शिवालय रेडीमेड या दुकानाच्या गल्ल्यातून अंदाजे ५ हजार रू गेल्याचे दोन्ही दुकान मालकांनी सांगितले, तसेच चोरट्यांनी ओम कलेक्शन हे दुकानही फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती मिळतच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुणावत, पोकॉ. नितीन इनामे, समाधान पाटिल , मनजीत जाधव, सोहळे, राहुल रनवीर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!