July 26, 2024
Home » धडावेगळे डोके करुन निघृण खुन केलेल्या आरोपींचा वाळूज एमआयडीसी पोलिसांना छडा…

न्यूज मराठवाडा 

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात दिनांक १५ जानेवारी रोजी फतेज फोर्जिंग बंद कंपनीमध्ये अनुओळखी व्यक्तीचे धडा वेगळे डोके करुन खुण झाल्याची घटना उघड झाली होती. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ह्या गुन्ह्यातील पोलीसांनी तपास करत अनोळखी व्यक्तिची ओळख पटवून दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव शेणपुंजी परिसरात मयताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खुण झालेला व्यक्तीचे नाव हे अजय व्यंकटराव निलवर्ण उर्फ देशमुख वय २१ रा. रांजनगाव शेणपुंजी सावता माळी मंदिरच्या पाठीमागे ता गंगापुर जि. औरंगाबाद असे नाव असल्याचे कळले, मयताची ओळख पटताच खुनातील आरोपी ठाणे येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले निखिल भाऊसाहेब गरड वय १९, रा जळगाव ता पैठण जि औरंगाबाद ह मू शिवनेरी कॉलनी रांजनगाव शेपू ता.गंगापूर जि औरंगाबाद, प्रतीक सत्यवान शिंदे वय २१ रा हिवरे ता कोरेगाव जि सातारा ह मू शिवनेरी कॉलनी रांजनगाव शेपू असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. 

मयत आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र असून ते दि १४ जानेवारी  रोजी दुपारी दारू पित उशीरापर्यंत बसले, त्यानंतर त्यांच्यात आपसात दारूपिता पिता वाद झाल्याने आरोपीतांनी सांयकाळ होताच ७ वाजताच्या सुमारास अजय व्यकंटराव निलवर्ण उर्फ देशमुख याला फतेजा फोर्जंग कंपनीच्या मोकळ्या मैदानात अजय याच्या दुचाकीवर  बसून घेवून गेले. अजय हा खुप दारूच्या नशेत असल्याने आरोपीतांनी त्यांचा मित्र अजय व्यकंटराव निलवर्ण उर्फ देशमुख याचे मुंडके धडा वेगळे करून त्याचा खुन केला, खुण केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून त्याचे मुंडके व छाती अजय याचे शर्टाने जाळण्याचा प्रयत्न करुन त्यांच्या मृदेहावर दगड माती व परिसरातील झाडाच्या फांदा टाकून लपवला होता. अजय याचा खुन केल्या नंतर दोघे ही अजय याची एच एफ डिलक्स मोटर सायकल घेवून आरोपी नगरच्या दिशेने फरार झाल्याची त्यांनी सांगीतले आहे.

 सदर कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुरमे,सचिन इंगोले, गणेश ताठे,सापोनी मदनसिंग  घुणावत, सपोनि गौतम वावळे, पोउपनि संदीप शिंदे, पोउपनि राहूल निर्वळ, पोउपनि सचिन पागोटे, पोउपनि, चेतन ओगले, पोउपनि. राजेंद्र बांगर, पोउपनि अशोक इंगोले, पोना बाबासाहेब काकडे, बाळु लहरे, पोअं. राजाभाऊ कोल्हे, पोअं. यशवंत गोबाडे, पोअं. अविनाश ढगे, पोअं. हनुमंत ठोके, पोअं. शिवनारायन नागरे, पोअं प्रदिप कुटे, पोअं. सुरेश कचे, पोअं सुरज अग्रवाल, पोअं. लखण घुसिंगे, तसेच गुन्हे शाखेचे सपोनि  काशीनाथ मांडुळे, पोउपनि प्रविण वाघ, पोअं राहूल खरात, अमोल शिंदे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, दादासाहेब झारगड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!