July 26, 2024
Home » वळदगावमध्ये पिस्टल बाळगणारा अटकेत; सातारा पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा

वाळूज महानगर : वळदगावमध्ये पिस्टल व दोन जीवंत काडतुस बाळगनारा व पिस्टल उपलब्ध करुन देणाऱ्या एकूण तिघांवर सातारा पोलिसांनी वळदगावमध्ये कारवाई केली आहे. ही कारवाई दि १६ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास करण्यात अली.

चेतन गणेश झळके, वय-22 वर्षे, रा.वळदगाव ता.जि.औरंगाबाद, अक्षय खंडागळे रा. औरंगाबाद, पिंटु पुर्ण नाव माहीत नाही. रा. गंगापुर,औरंगाबाद असे आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन गणेश झळके याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वळदगाव येथे सापळा रचत गणेश झळकेच्या ताब्यातून ३० हजार रु किमतीचा गावठी कट्टा (पिस्टल) व २ हजार रु किमतीच्या दोन जिवंत काडतुसे जप्त केले तसेच अक्षय खंडागळे रा.औरंगाबाद व  पिंटु याने त्यास बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतुसे उपलब्ध करुन दिली. याप्रकरणी सातारा  पोलीस ठाण्यात सहायक फौजदार नंदकुमार पुंडलिक भंडारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे हे करीत आहे. सदसरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, शेवाळे,पोलीस उपनिरीक्षक सानप, पोलीस उपनिरीक्षक गोरे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारी, धूळे, रामेश्वर कवडे, शिंदे, खिल्लारे यांनी पार पाडली.

_____________


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!