July 26, 2024
Home » बेपत्ता दोघी बहीणींचा आढळला विहिरीत मृतदेह, कन्नड येथील धक्कादायक घटना

कन्नड (औरंगाबाद) : तालुक्यातील चिखलठाण येथूनबेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणीचा मृतदेह विहीरीतील पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्वाती आणि शीतल दत्तू चव्हाण असे मृत मुलींचे नाव आहे. दत्तू बाबुराव चव्हाण हे शेतात राहतात. त्यांच्या दोन मुली स्वाती दत्तू चव्हाण (१८) व शितल दत्तू चव्हाण या बेपत्ता असल्याची खबर १४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी दत्तू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत स्वातीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यानंतर काही वेळातच शितलचा मृतदेह त्याच विहिरीत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच सपोनि टी आर भालेराव, पोउपनि राम बारहाते, सहाय्यक फौजदार सतिष खोसरे, कैलास करवंदे, संजय आटोळे, शिवदास बोराडे हे , घटनास्थळी रवाना झाले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!