July 22, 2024
Home » सहायक पोलीस आयुक्तांकडून महिलेची छेड;गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा
औरंगाबाद शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस आयुक्तांवरच महिलेची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी असलेले विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी विनंती ढुमे यांनी आपल्या मित्राकडे केली. त्यामुळे मित्राने देखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले. 

गाडीत बसताना त्यांच्या मित्र आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागच्या सीटवर बसले होते. दरम्यान गाडीत बसताच दारूच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी गाडीतच महिलेची छेड काढायला सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी पुन्हा मित्राला विनंती केली. तर घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. पण तिथेही महिलेची छेडछाड केली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

……………………………………………………..

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!