July 23, 2024
Home » महिलेची गंठन हिसकावले; बजाजनगरातील घटना…

वाळूज महानगर : न्यूज मराठवाडा
बजाजनगरातील विठ्ठलकृपा सोसायटीमधील एका महिलेचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी हिसकावले असून ही घटना दि १५ जानेवारी रोजी जागृत हनुमान मंदिरासमोर साडेबार वाजेच्या दरम्यान घडली.

पार्वती संजय पतंगे वय ४५, श्री विठ्ठलकृपा सोसायटी जागृत हनुमान मंदीरजवळ बजाजनगर असे गंठन गेलेल्या महिलेचे नाव आहे. आज मकरसंक्रांत असल्याने पुजेसाठी पार्वती पतंगे, विद्या पाटिल, शालिनी श्रीरामे, लता दवंगे ह्या चौघी महिला साडेबारा वाजेच्या सुमारास जागृत हनुमान मंदिरामध्ये पुजेसाठी जात असतांना जागृत हनुमान मंदिराकडून एम एच १६ जी एफ ५३८२ या दुचाकीवर दोन जण समोरून येऊन पार्वती पतंगे या महिलेच्या गळ्यातील ६ तोळ्यांचे राणी हार, मिनी गंठन, साधा हार चोरट्यांनी हिसकावले. झटापटीत साडेचार तोळ्यांचे सोने परत मिळाले परंतु दिड टोळे चोरटे घेऊन पसार झाले महिलांनी आरडाओरड करत विठ्ठल कृपा सोसायटीकडे धावत असतांना तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. वैष्णव देवी मंदीराजवळ चोरट्यांना तरुणांनी पकडले दरम्यान चोरट्यांनी तरुणांवर कट्टा उगारून बंद पडलेल्या कंपनीमध्ये पळ काढल्याचे तरुणांनी सांगितले. घटनेची माहिती मिळतच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांचासह अधिकाऱ्यांनी धाव घेत चोरट्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!