July 23, 2024
Home » आर.टी.ओ ऑफिस औरंगाबाद तर्फे राष्ट्रीय रोड सुरक्षा सप्ताह निमित्त इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे कामगार कर्मचाऱ्यासाठी कार्यशाळा…

आर.टी.ओ ऑफिस औरंगाबाद व इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने कामगार व कर्मचाऱ्यांसाठी रोड सुरक्षा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यात मुख्य मार्गदर्शन नितीन गोणारकर व शिवशंकर धोंडे यांनी केले यात प्रामुख्याने वाहन चालवतेवेळी घ्यावयाची काळजी जसे की, हेल्मेट वापरणे , स्पीड लिमिट पाळणे, वाहनांची योग्य देखभाल घेणे , भ्रमणध्वनीचा वापर टाळणे इत्यादी गोष्टी पाळण्याचं तसेच वेग मर्यादा , शीटबेलचा वापर करणे दर २ तासाने १५ मिनिटांचा ब्रेक घेणे ,ड्रायव्हरला २०० मीटरची व्हिजिबिलिटी असणे गरजेचे तसेच रस्त्यावर घडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करणे इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन करून २०२३ वर्षांमध्ये रस्ते अपघात ३० % मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान केले इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा दिली.

रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा

रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे , अपघात ग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे, मी सदैव स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमाचे व कायद्यातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करीन, मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, माझा देश अपघात मुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी, सदैव प्रयत्न करीन, रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन, रस्ता सुरक्षेतेचा प्रचार व प्रसार आणि देश बांधवांच्या सुरक्षेत माझे सदैव सौख्य सामावले आहे.

जय हिंद !

त्यावेळी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे संजय चौबे , भागीनाथ गोरे , प्रफुल्ल कांबळे, संतोष देशमेख, नीलेश त्रिवेदी , गिरीधर गायकवाड , संतोष माणिकशेट्टी , कमलेश जैन, अजिनाथ सुरवसे, रमेश बिरादार, संतोष कोटकर व २०० पेक्ष्या जास्त कार्मगार कर्मचारी उपस्थित होते. अभार प्रदर्शन एकनाथ पवार यांनी केले.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!