July 23, 2024
Home » परदेशी इ-सिगरेट वितरण करणाऱ्या बजाजनगरातील तरुणावर सातारा पोलिसांकडून कारवाई, पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

न्यूज मराठवाडा 

वाळूज महानगर : शासनाने इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट  उत्पादन, निर्मीती, आयात, निर्यात, वाहतुक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात याला बंदी घातलेली असतांना परदेशी बनावटीच्या ई सिगारेट  बेकायदेशिररित्या वितरणासाठी जवळ बाळगल्या प्रकरणी सातारा पोलिसांकडून लुधियाना पान शॉप पंढरपुर कामगार चौक औरंगाबाद नगर हायवे रोड औरंगाबाद येथे कारवाई करण्यात अली आहे. ही कारवाई दि ११ जानेवारी रोजी रात्री सडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात अली असून विविध परदेशी बनावट इ सिगरेटचा एकूण ३२ हजार २०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

प्रविण दगडू पैठणपगारे वय 24 वर्षे रा. बजाजनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, घर नं. 88 एम.आय.डी.सी. वाळुज, औरंगाबाद असे आरोपीचे नाव असून दि ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या आरोपी  प्रवीण याने  लुधियाना पान शॉप पंढरपुर कामगार चौक औरंगाबाद नगर हायवे रोड, औरंगाबाद  येथे  शासनाने प्रतिबंधीत केलेले  9,000/रुपये किं YUOTO THANOS 5000  कंपनीच्या ई सिगारेट्स ,10 ई सिगारेट्स  

7,200/रुपये किं.YUOTO XXL 2500 कंपनीच्या ई सिगारेट्स  08 ई सिगारेट्स , 11,000/रुपये किं.ENERGY Dispoable Device 850 mAh 5000 PUFFS SALT NIC 5%  कंपनीचे ई सिगारेट्स 05 ई सिगारेट 8,000/ रुपये किंमतीचे ELFBAR BC 5000 कंपनीचे ई सिगारेट्स 04 ई सिगारेटएकुण 35, हजार 200/रुपये  परदेशी बनावट इ सिगरेट  बेकायदेशिररित्या वितरणासाठी जवळ बाळगलेला पोलिसांना मिळाला असून याप्रकरणी पोहे. सुनील धुळे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार भंडारे हे करीत आहे.

————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!