July 23, 2024
Home » पतंग उडवताय…मग ही काळजी घ्या!

बालदोस्तानो, पतंग उडवणे हा खूप चांगला खेळ आहे, मात्र याचे काही दुष्परिणामही आहेत. पतंगाचा मांजा फार धारदार असतो. मांजा आपल्या शरीराला लागला तर फार मोठी इजा होऊ शकते. थायलंडमध्ये पतंग कसे उडवावेत याचे नियमही आहेत. शिवाय पतंग खेळायला जाताना काय काय साधनं आपल्याकडे ठेवली पाहिजेत याची तत्त्वे काही देशांमध्ये दिली जातात. त्यामुळे पतंग उडवताना आपणही तेवढीच काळजी घेतली पाहिजे.

शिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अथांग आकाशात पक्षी स्वच्छंदी फिरत असतात. मात्र आपण उडवत असलेल्या पतंगाचा मांजा त्यांना लागला तर त्यांचा जीव जाऊ शकतो. आधीच पक्ष्यांची संख्या कमी होतेय, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, त्यात जर आपल्या खेळामुळे कोणा मुक्या पक्ष्यांचा जीव जाणं हे वाईट ठरेल. त्यामुळे पतंग उडवताना योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!