July 23, 2024
Home » परिसरात हळहळ ; पती कडून पत्नी व अडीच वर्षाच्या मुलाची हत्या

न्यूज मराठवाडा

औरंगाबाद येथील कांचनवाडी भागात चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपल्याच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हि घटना आज 9 जानेवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली पैठणरोड ते आनंद विहार जाणारे रोडवर धुत बंगल्या समोर असलेल्या  समीर म्हस्के याच्या घरी घडली.

आरती समीर म्हस्के  वय  26 वर्ष,  मुलगा निशांत समीर म्हस्के  वय 2.5 वर्ष असे मयताचे नाव असून पती समीर विष्णु म्हस्के  सासू सुनिता विष्णु म्हस्के  दोन्ही रा. भाग्यनगर, बाबा  पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर म्हस्के याच्या घरी आरती हीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन, समीर याने त्याची आईच्या  सांगण्यावरुन आरती व नातु निशांत यांना आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन, आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळुन या दोघांचा खुन केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!