July 23, 2024
Home » आजपासून औरंगाबादमध्ये ‘ॲडव्हाटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’

Advantage Maharashtra Expo 2023: औद्योगिक प्रदर्शन अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023ची (Advantage Maharashtra Expo 2023 Aurangabad) तयारी पूर्ण झाली आहे. शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरिक (DMIC) येथे 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान उद्योजकां प्रदर्शन भरणार आहे. तर उद्या गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं ‘ऑनलाइन उद्घाटन’ होणार आहे. तर यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद (Aurangabad) येथील अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला हजेरी लावणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

मराठवाड्यातील उद्योजकांची संघटना ‘मसिआ’च्या वतीने आयोजित केलेले हे प्रदर्शन तब्बल 30 एकरांवर भरवले जात आहे. यासाठी 4 दिवसांत 650 स्टॉल्स आणि 11 चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. तर समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!