July 22, 2024
Home » पगाराचे पैसे देण्याचे कारणावरून चाकूने मानेवर, पोटावर सफासफ वार

न्यूज मराठवाडा 

वाळूज महानगर :  पगाराचे पैसे देण्याचे कारणावरून लाकडी दांड्याने व चाकूने मानेवर, पोटावर सफासफ वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जोगेश्वरी येथे घडली आहे.ही घटना दिनांक १ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विशाल सदाशिव पवार, वय 27 वर्ष, रा. जोगेशोरी , गंगापूर, औरंगाबाद. व त्याचा भाऊ तथागत चौक येथे उभे असताना यातील आरोपी  कृष्णा मगरे, अनिल एडके, करण चौथमल, आकाश शेरे, सुंदर चौथमाल सर्व रा.जोगेश्वरी तेथे आले व  विशाल पवार  व त्याच्या भावाला शिवीगाळ करून पगाराचे पैसे देण्याचे कारणावरून आरोपी कृष्णा मगरे याने विशाल  पवार व त्याच्या भावाला लाकडी दांड्याने व चाकूने मानेवर, व पोटावर सफासफ वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आयपीसी 307,324,504,143,147, 148,149  या कलमा अंतर्गत वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे. 

———————-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!