July 26, 2024
Home » दारू दिली नाही म्हणून वाद; हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी..

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; पोलिसांकडून चाकू जप्त

वाळूजमहानगर ( औरंगाबाद ) : तु माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली? असे म्हणुन शिवीगाळ करुन संभाजी वीर नावाच्या एका (हॉटेलमध्ये कुक) ने हॉटेल मालकाच्या अंगावर चाकु घेवुन धावुन आला. ही घटना गुरुवारी दि २९ रोजी अडीच वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील हॉटेल मोरया येथे घडली.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील गणेश बीरंगळ याचे महाराणा प्रताप चौक, बजाजनगर हाँटेल मोरया बार ॲन्ड रेस्टॉरंट अॅन्ड लॉज आहे. गुरुवारी २९ रोजी 2.30 वाजेच्या सुमारास गणेश बिरंगळ हे हॉटेल मोरया लॉजवर असतांना संभाजी वीर व स्वप्नील गालफाडे असे लॉजवर आले. व म्हणाले की, आम्हाला दारु पाहीजे, हाँटेल व बार बंद केले आहे, तुम्हाला दारु मिळणार नाही असे बिरंगळ त्यांना सांगितले त्यावेळी संभाजी व स्वप्नील यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हाँटेलच्या बोर्डावर व शटरवर दगड फेक करुन नुकसान केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गणेश बिरंगळने तक्रार दिल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा मनात राग धरुन आरोपी संभाजी वीर हा गुरुवारी २९ रोजी रात्री पुन्हा त्याच हॉटेलवर आला. व तु माझ्या विरुद्ध तक्रार का दिली. असे म्हणुन शिवीगाळ करुन गणेश बिरंगडच्या अंगावर चाकु घेवुन धावुन आला.

यावेळी हॉटेल मधील स्टाफ व बिरंगळ यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याचे नाव गाव विचारले असता संभाजी अहिलाजी विर, वय-32 वर्षे, धंदा-कुक, रा.छत्रपतीनगर, वडगाव कोल्हाटी. असे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एक धारदार चाकू जप्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!