July 23, 2024
Home » नाचतांना धक्का लागला; मामानेच केला भाच्याचा खून…

औरंगाबाद : किराडपुरा भागात धक्कादायक घटना समोर आली असून, वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या वादातून एकाची खून करण्यात आली आहे.

पाच वर्षीय मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने मामाने आपल्याच भाच्याचा जीव घेतला आहे. सय्यद माजिद सय्यद पाशा (वय 35 वर्षे, रा.गल्ली क्र-6 किराडपुरा) असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मजर पठाण, मुज्जू पठाण, अरबाज पठाण, जाकेर पठाण, सलमा पठाण (सर्व राहणार गल्ली क्र-6  मक्कामस्जिद जवळ किराडपुरा औरंगाबाद) अशी आरोपींचे नावं आहे.– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!