July 23, 2024
Home » औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून कुऱ्हाडीचे सफासफ वार करून निर्घृण खून

औरंगाबाद : पुणे महामार्गावर दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे आज पाच वाजेच्या च्या दरम्यान भर रस्त्यावर बापु छब्बू खिल्लारे वय वर्ष 30 या युवकाचा कुऱ्हाडीने सपासप वार करून आरोपीने निर्घृण खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर खून केल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करून मोटर सायकल वरून पसार झाला,अशी माहिती मिळाली आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकर भोकर येथून आरोपीच्या बहिणीस तीन वर्षांपूर्वी मयत (बापु छब्बू खिल्लारे), यांनी पळून नेल्याचा राग मनात धरून आरोपीने कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पुणे ह्या वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या रक्तबंबाळ मयतास घाटी रुग्णालयात दाखल केले.


तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिली. तसेच घटना भर रत्यात झाल्याने जवळपास १० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. सविस्तर बातमी

https://www.youtube.com/@newsmarathwada22


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!