July 22, 2024
Home » प्रेमाच्या जाळ्यात ओढुन दहा लाखाची मागणी; विवस्त्र करून विडियो व्हायरल करण्याचीही धमकी,

सातारा पोलिस ठाण्यात एका महिलेसह पुरुषावर गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद मधील सातारा परिसरात एक महिलेने पुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन, मारहाण करून विवस्त्र करत त्याचा विडियो बनवला तो विडियो व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपयाची मागणी केल्याची घटना सातारा परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात दि 27 रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेसह चार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय तक्रारदार जिल्हा अ. नगर ह मु. श्रीराम नगर, सातारा परिसर औरंगाबाद हे  दि 29 सप्टेंबर 2022 ते दि 27 सिडेंबर 2022  दरम्यान एक महिलेसोबत असलेल्या  शारीरिक संबंधाच्या कारणावरून तक्रारदार यांना दि 19 डिसेंबर 2022 रोजी बीएमडब्ल्यु कार नंबर MH-22-U-7777 मध्ये पटेल लॉन्स येथे तुमच्या ऑफीसचे पार्सल आहे असे म्हणून  भेटले. त्यावर तेथून ऑफीसला या असे सांगीतल्याने रेल्वे स्टेशन येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय येथे प्रतिक जाधव व संजय जाधव यांनी येवून संजय जाधव यांनी मी PI प्रदिप घुगे, मुंबई क्राईम ब्रांच असे पोलीस असल्याची बतावणी करुन तक्रारदार यांना  बीएमडब्ल्यु कारमध्ये जबरदस्तीने बसवून हॉटेल पाटीलवाडा येथे नेवून संबंधित महिलेने  गुन्हा दाखल केला असल्याची भिती दाखवून तक्रारदार यांना  हाताचापटाने मारहाण करून  विवस्त्र व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देवून एकूण 40 हजार 300 रूपये व हॉटेल पाटीलवाडा येथे जेवणाचे बील अंदाजे 950  रूपये व वाईन शॉपवर दारूचे पैसे 720  रूपये असे एकूण 41 हजार  970 रूपये घेतले. व संबंधित महिले सोबतचे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रूपयाची मागणी करून त्यापैकी पाच लाख रुपये दे असे म्हणुन  तक्रारदार यांची  बुलेट जबरदस्तीने ताब्यात घेऊन पाच लाख रुपये घेऊन ये आणि बुलेट घेऊन जा असे म्हणून व बलात्काराचा गुन्हा दाखल करतो म्हणून खंडणीची मागणी केली.  याप्रकरणी एका महिलेसह संजय पंडित जाधव, राहणार बंजारा कॉलनी औरंगाबाद नकीब नसीर पटेल राहणार सिल्क मिल कॉलनी औरंगाबाद प्रतीक सुधीर जाधव राहणार समर्थ नगर औरंगाबाद यांना पोलिसांनी अटक करून पुढील तपास सहयाक पोलिस निरीक्षक शेळके हे करीत आहे. 

हि कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त निखील गुप्ता पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे श्री. शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभागाचे विशाल ढुमे, सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनायक शेळके, पोउपनि देविदास शेवाळे, पोउपनि संभाजी गोरे, पोउपनि अणिता फासाटे, सफो/नंदकुमार भंडारे, पोह/ अनिलकुमार सातदिवे, सुनिल धुळे कारभारी नलावडे, मनोज अकोले, भैरवी बागुल, सुनिता गोमलाडू, पोशि/दीपक शिंदे, सुनिल पवार, रामेश्वर कवडे, कपिल खिल्लारे पोलीस स्टेशन सातारा, औरंगाबाद शहर यांनी केली आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!