July 18, 2024
Home » एक कोटी पाच लाख रुपये किंमतीची मूर्ती चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात..

औरंगाबाद : कचनेर येथील  श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिराचे गाभाऱ्यातील पार्श्वनाथ भगवंताची  एक कोटी पाच लाख रुपये किंमतीची ०२ किलो ५६ ग्रॅम वजनाची सुवर्ण धातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरुन त्याठिकाणी पार्श्वनाथ भगवंताची पिताळाची मुर्ती ठेवुन मुख्य सुवर्ण धातूची मुर्ती चोरुन नेली ही घटना दि २५ रोजी उघडीस आली होती. याप्रकरणी  चिकलठाणा  पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडले असून एकूण ९४  लाख ८७  हजार  ४९७  रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याच्या तांत्रीक विश्लेषणावरुन खात्रीलायक पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी नामे अर्पित नरेंद्र जैन रा. शिवपुरी जि. गुणा राज्य मध्यप्रदेश, अनिल भवानीदिन विश्वकर्मा रा. शहागड जि. सागर राज्य मध्यप्रदेश यांनी केलेला आहे, 

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींचा मध्य प्रदेश राज्यात जाऊन शोध घेतला असता आरोपी अर्पित नरेंद्र जैन, अनिल भवानीदिन विश्वकर्मा यांना ताब्यात घेऊन चोरलेल्या सुवर्ण धातूच्या मुर्तीचे इलेक्ट्रीक कटर व हातोडयाच्या सहाय्याने तुकडे केले असुन त्यापैकी काही तुकडे हे भोपाळ राज्य मध्यप्रदेश येथील सराफास विक्री केले आहे व आलेल्या पैशातून सोन्याचे दोन शिक्के खरेदी केले असुन, काही रक्कम कर्ज फेडण्यासाठी दिले आहे अशी कबुली देऊन उर्वरित मुर्तीचे ८७,५६,१९५/- रुपये किंमतीचे १६०४.९८ ग्रॅम सोन्याचे तुकडे, ६,२९,३०२/- रुपये किंमतीचे सोन्याचे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ०२ ग्रॅम वजनाचे व ०१ ग्रॅम वजनाचे सोच्याचे दोन शिक्के असे एकुण १७०६.९८ ग्रॅम सोने एकुण किंमत ९३,८५,४९७/- रुपये व ७०,०००/- रुपये रोख रक्कम, ३२,३००/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट व सुवर्ण मुर्तीचे तुकडे करण्यासाठी वापरलेले एक इलेक्ट्रीक कटर, ०३ लहान मोठया हातोडया, ०१ लोखंडी पकड, ०१ व्हेक्सा ब्लेड कटर, ०१ छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्येमाल आरोपीतांचे ताब्यातून एकुण ९४,८७,७९७/- ( चौन्यान्य लाख सत्ताऐंशी हजार सातशे सत्त्यान्नव) रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, मनिष कलवानीया यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग औरंगाबाद ग्रामीण श्री. जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, देविदास गात, पोउपनि प्रदीप ठूबे, विजय जाधव, पोह लहू थोटे, श्रीमंत भालेराव, पोना शेख नदीम, पोकॉ राहूल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!