July 26, 2024
Home » आई-वडील पैसे देत नाही म्हणून खर्चासाठी चोरल्या तब्बल 36 दुचाकी

विद्यार्थ्याची अनोखी शक्कल, शेतात लपवून ठेवल्या होत्या दुचाकी

Aurangabad : आई वडील खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून दुचाकींची चोरी करण्याचा धंदाच फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला. पोलिसांनी त्याच्याकडून 14 लाख 95 हजार रुपयांच्या तब्बल 24 दुचाकी तर त्याच्या मित्राकडून सात लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी या सर्व दुचाकी शेतातून हस्तगत केल्या आहेत. शैलेश खेडकर या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसह त्याचा विजय अळींग अशी दुचाकी चोरांची नावे आहेत. दोन्ही आरोपींकडून तब्बल 21 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 36 दुचाकी हस्तगत केल्या असून, सहा पोलीस ठाण्यातील 37 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!