July 26, 2024
Home » गंगापूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या,

शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसान भरपाईचे अनुदान जमा करा शेतकऱ्यांची मागणी

Gangapur : शासनाने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह राज्यभरातील शेतकऱ्यांना अतिवृष्ठिने नुकसान झाल्याने हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयांची नुकसानभरपाईची मदत जाहीर केली होती मात्र ही नुकसानभरपाईची मदत सुधारित ऑनलाईन कार्यपद्धतीच्या जाचक अटीमुळे अद्यापहीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही कारण प्रशासनाने मदत खात्यात वर्ग करण्यासाठी सुधारित ऑनलाईन कार्यपद्धती ही जाचक अट रद्द करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची मदत वर्ग करावी या मागणीसाठी गंगापूर येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार सतीश सोनी यांच्या दालनात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत ही जाचक अट रद्द होत नाही तोपर्यंत दालनातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.


सरकारने अतिवृष्ठीणे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आर्थिक मदत वर्ग करण्यासाठी सुधारित ऑनलाईन कार्यपद्धती ही जाचक अट घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी विलंब होत असून शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी ही अट तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची मदत वर्ग करावी यासाठी उद्या सोमवारी गंगापूरच्या तहसीलदरांच्या दालनात शेतकऱ्यांसाह ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!