July 23, 2024
Home » 80 हजाराची लाच मागणारा बिडकीन येथील पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात…

बिडकीन : बिडकीन ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाच मागितल्याप्रकरणी व लाच तडजोडीसाठी मध्यस्थी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली आहे. विजय पवार पद पोलीस नाईक नेमणूक बिडकीन पोलीस स्टेशन औरंगाबाद (ग्रामीण), गुलाब छगन चव्हाण पद – पोलीस पाटील डोंगरूनाईक तांडा जि. औरंगाबाद असे दोन्ही आरोपीचे नाव असून हि कारवाई आज दिनांक 26 रोजी करण्यात अली आहे.

अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे 354 प्रमाणे दाखल असणाऱ्या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी 80 हजार रुपायाची लाचेची मागणी करून 50 हजार रुपये तडजोडी अंती लाचेची मागणी केली. तसेच जेवणासाठी रुपये 2 हजाराची तात्काळ फोन पे करण्यास सांगून तडजोडी अंती 1500 रुपायाची लाचेची मागणी केली.
तसेच आरोपी चव्हाण यांनी दाखल गुन्हाचे तपासी अमलदार यांचे कडून दाखल गुन्हयात मदत मिळवून देण्यासाठी तडजोडीची लाचेची रक्कम ठरवण्यासाठी पंच साक्षीदार समक्ष मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर
पो.ह. राजेंद्र जोशी पो.ना. भूषण देसाई पो.ना. दिगंबर पाठक ला.प्र.वि, औरंगाबाद यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!