July 22, 2024
Home » पुन्हा वाळूज महानगरमध्ये पहिला करोना रुग्ण; करोना चाचण्या वाढवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

न्यूज मराठवाडा

वाळूज महानगर :  कोरोना पुन्हा वाढण्याची चिन्हे असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण वाळूज महानगरमधील कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्याचा आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे.

या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको वाळूज महानगरातील या रुग्णाला गंभीर लक्षण नसल्याने त्याला त्याच्या राहत्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. औरंगाबाद आरोग्य अधिकाऱ्यांकडून करोना चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून, खबरदारी म्हणून लक्षणे वाटल्यास नागरिकांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!