July 23, 2024
Home » शेतकऱ्याचे पपईचे झाडे अज्ञाताने कापून टाकले; करोडी येथील धक्कादायक प्रकार …

औरंगाबाद . करोडी येथील शेतकऱ्याचे 350 पपईचे झाडे अज्ञाताने कापून टाकले असून झाडे कापलेल्या अवस्थेत बघताच शेजाऱ्याला आपले अश्रू आवरता आले नाही. हि घटना दिनांक 22 रोजी सकाळी उघडकीस आली.

रामभाऊ गोविंदा दवंडे यांची कारोडी गट नं 85 मध्ये सात एकर शेती आहे त्यामध्ये एक एकर पपई या पिकाची लागवड केलेली आहे. दिनांक 21 रोजीच्या रात्री अज्ञातांनी 350 पपईच्या झाडे कापून पपई पिकांचे नुकसान केले आहे. झाडांची नुकसान बघताच शेतकरी दवंडे यांना अश्रू आवरता आले नाही, या कापलेल्या झाडांची एकूण किंमत 2 ते 3 लाख आहे. हे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी रामभाऊ दवंडे यांनी केली आहे, याप्रकारणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे कृत्य करणार्याचा पोलीस शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!