July 23, 2024
Home » वाळूज महानगरातील सकल जैन समाजातर्फे मुख मोर्चा

श्री सम्मेदशिखरजी सिद्धक्षेत्रला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाला विरोध

वाळूज महानगर : झारखंड राज्यातील जैनांचे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याबद्दल जैन धर्मप्रेमींनी झारखंड सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातध वाळूज महानगरातील सकल जैन समाजातर्फे दिनांक 21 रोजी मुख मोर्चा काढण्यात आला आहे.

हा मुख मोर्चा जैन मंदिर, प्रताप चौक, मोरे चौक, महावीर चौक, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे असा काढण्यात आला असून यामध्ये मोठ्या संख्येने पुरुषांसह महिला, लहान मुले सहभागी होऊन निषेध नोंदवला आहे. यावेळी अनिल चोरडिया, राजेंद्र अवतार, पवनजय पाटील, चंद्रकांत चोरडिया, महावीर धुमाळे, जीवन गंगवाल, संतोष चोरडिया, सुजित गोडा, राजेंद्र काला, मनोज कासलीवाल, मनोज साक्लेचा नीरज साक्ला यांच्यासह आदींचा मोर्चामध्ये सहभाही होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!