July 26, 2024
Home » समृद्धी महामार्गावर तो हवेत गोळीबार नाही, विडिओ स्पेशल इफेक्ट.

वापरलेली बांधून निघाली मुलांची खेळणी ..

औरंगाबाद : समृध्दी महामार्गावरिल बोगद्याजवळ चारचाकी वाहनाचे समोर येते त्याच्या जवळील व कबज्यात अनाधिकृतपणे बेकायदेशिर अग्नीशस्त्रातुन हवेत फायरिंग करून दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित केल्याची घटना दि 14 रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुरंन 390/22 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी घटनेची गांर्भीयाने दखल घेवुन व्हिडीओतील व्यक्ती व त्याने वापरलेले शस्त्र यांचा शोध घेण्याची सुचना फुलंब्री व स्था.गु.शा चे पोलीस पथकांना दिल्या. यावरुन पोलीसांची पथके ही व्हिडीओतील व्यक्तीचा शोध घेत असतांना त्याचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने त्यास दिनांक 16 रोजी फुलंब्री पोलीसांचे पथकाने त्यास ताब्यात घेतले चंद्रकांत कैलास गायकवाड उर्फ बाळु गायकवाड वय 30 वर्षे रा. बेगमपुरा, औरंगाबाद असे आरोपीचे नाव असून सोशल मिडयावर प्रसारित केलेल्या त्याच्या व्हिडीओतील अग्नीशस्त्रा बाबत सखोल चौकशी करता त्याने नमुद व्हिडीओ बनविण्याकरिता मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची खेळणीतील बंदुक वापरल्याचे सांगुन व्हिडीओ एडिटिंग करणा-या मित्राच्या साहय्याने त्या व्हिडीओतील अग्नीशस्त्राला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवुन बनविला असल्याचे कबुल केले.

यावरुन व्हिडीओ एडिटिंग करणा-या त्याच्या मित्राची तपास पथकाने कसुन चौकशी करता, त्याने आरोपीच्या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवुन तयार केल्याचे मान्य करून मुळ व्हिडीओतील बदलांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यातील व्हिडीओतील वापरलेली अग्नीशस्त्रांची सत्यता तपासले असता त्यांने व्हिडीओमध्ये वापरलेले बंदुक ही मुलांचे खेळण्यातील असुन, व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साउंड देवुन बनविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

*मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक,* औरंगाबाद ग्रामीण यांनी आवाहन केले आहे कि, अशा प्रकारे सोशल मिडियावर स्टंटबाजी करून, धोकादायक शस्त्रांसह फोटो काढुन, समाजात दहशत पसरविणा-या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. युवकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये. प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारी कृत्ये करून त्याचे व्हिडीओ, फोटो,सोशल मिडियावर व्हायरल करु नये. अशा प्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून अशा व्यक्तींला सक्त व कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. नमुद गुन्हयांचा तपास मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र निकाळजे, श्री. श्रीनिवास धुळे, पोलीस उप निरीक्षक,पोलीस अंमलदार आनंद पांचगे, कौतिक चव्हाण, साळवे यांनी केली आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!