July 22, 2024
Home » करोडीत ९६, साजापूरात ८५ टक्के मतदान; २० डिसेंबरच्या निकालाकडे लक्ष..

NEWS MARATHWADA
वाळूज : साजापूर व करोडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज रविवार दि.१८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत करोडीत ९५.८८ तर साजापुरात ८५.३६ टक्के मतदान झाले. असून मंगळवार (दि.२०) होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.


या ग्रुप ग्रामपंचायत विभाजन करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच साजापूर व करोडी या दोन ग्रामपंचायतीच्या स्वतंत्रपणे निवडणुक पार पडली. आज रविवारी सकाळपासून दोन्ही गावातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी हात जोडून अभिवादन करतांना दिसून आले. साजापूरात मतदारांना आणण्यासाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. सकाळच्या सत्रात बहुतांश मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

दुपारनंतर मतदारांची संख्या रोडवल्यानंतर सांयकाळी पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. कारखान्यातून सुट्टी झाल्यानंतर अनेक कामगार मतदारांनी मतदान केले. साजापूर ग्रामपंचायतीमध्ये एकुण ४ वार्डातुन ११ सदस्य निवडले जाणार असून येथील सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सरपंचपदासाठी माजी जि.प.सदस्य सय्यद कलीम यांच्या एकता पॅनलकडून सरपंचपदासाठी जनार्धन बन्सोडे तर जाफर पटेल यांच्या जनता पॅनलकडून रुख्मणबाई बन्सोडे यांच्यासह १८ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. करोडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून एकुण ३ वार्डातुन ७ सदस्य निवडले जाणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=D0S8pw1B7Zk

या निवडणुकीत काँग्रेसचे पश्चिम तालुकाध्यक्ष सर्जेराव पा.चव्हाण यांच्या सर्वधर्म समभाव विकास पॅनल व विरोधी शिवसेनेचे ज्ञानेश्वर गोल्हार यांच्या जय शिवशंभू पॅनल मध्ये सरळ लढत होत आहे. सरपंचपदासाठी सर्जेराव चव्हाण पॅनलच्या सुनिता गवांडे तर विरोधी शिवसेनेचे ज्ञानेश्वर गोल्हार पॅनलच्या सुलोचना जाधव व अपक्ष वर्षा जाधव यांच्यासह १५ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. या दोन्ही गावातील मतदान केंद्रावर पोलीस उपायुक्त दीपक गिरहे, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी भेट देऊन पाहणी केली.


साजयपूरला ८५ तर करोडी तर ९६ टक्के मतदान
साजापूर येथे एकूण ३ हजार ९९० पैकी ३ हजार ४०६ तर करोडी येथे १ हजार २० पैकी ९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी झोनल ऑफिसर विकास काकडे, मास्टर ट्रेनर जे.पी. पठाण, एच.यु.यांनी काम पाहिले.

जिल्ह्यात झालेले मतदान : ७४.०७ %

औरंगाबाद ७५.९६ %, पैठण ७१.६१ %, फुलंब्री ७५.०६ %, सिलोड ७५.१६%, सोयगांव ७४.७५ %, कन्नड ७५.३५ %, खुलताबाद ७४.८४ %, वैजापुर ७२.४८ %, गांगपूर ७१.४१ %Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!