July 23, 2024
Home » गरूड झेपच्या संचालकांवर गुन्हा दाखल

वीस वर्ष जुनी झाडे तोडली : अतिक्रमण करण्याचाही केला प्रयत्न

वाळूज : सुमारे वीस वर्ष जुनी झाडे तोडून दुसर्याच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गरूड झेप अकॅडमीच्या दोन्ह संचालकासह चाळीस ते पन्नास जणांविरुध्द बुधवारी दि. १४ रात्री एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसगाव शिवारातील गट नंबर १५० मध्ये भागीनाथ आसाराम साळे (५२ रा. तिसगाव) यांची वडिलोपार्जित एक हेक्टर ७६ आर जमीन आहे. त्यापैकी सुमारे एक हेक्टरवर आंबा, नारळ, लिंबु ची झाडे आहेत. तसेच त्यांच्या जमीनी लगत असलेल्या गट नंबर १४६ मधील १२ एकर ३४ गुंठे ही जमीन त्यांचे आजोबा गंगाराम नामदेव साळे, तुकाराम गंगाराम साळे व बापू यादव साळे यांनी चंद्रप्रभा मदनलाल झंवर यांना विक्री केलेली आहे. दरम्यान गट नंबर १५० लगत असलेले प्लॉट नंबर ६३ से ६९ व १०४ हे प्लॉट आजही साळे यांच्याच ताब्यात आहे.

मात्र १० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गरूड झेप अकॅडेमीचे संचालक सुरेश साहेबराव सोनवणे आणि निलेश साहेबराव सोनवणे या दोघांनी त्यांचे सोबत वडगाव कोल्हाटी येथील संतोष उर्फ राजु विश्वनाथ झाल्टे व सुमारे ४० ते ५० जणांना सोबत घेऊन साळे यांच्या शेतातील सुमारे वीस वर्ष जुनी झाडे तोडली. तसेच शेताचे तार कंपाउंड जे.सी.बी. च्या सहाय्याने तोडुन साळे यांच्या जागेवर अतिक्रमण करत होते. याप्रकरणी भागीनाथ साळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक अशोक इंगोले प्रकरणाचा तपास करीत आहेत.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!