July 18, 2024
Home » पुरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; वाळूज परिसरात खळबळ, घातपाताचा संशय


वाळूज : आज वाळूज येथे खळबळजनक घटना समोर अली आहे. तीन महिन्यापासून बंद असलेल्या एका घरातील किचन रुममध्ये आज बुधवार दि.१४ सांयकाळी मिठात पुरलेला मृतदेह मिळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने मृतदेह महिलेचा व पुरुषाचा या विषयी गुढ कायम असून हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.


वाळूजच्या समता कॉलनीत सुर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे. ७ महिन्यापुर्वी सुर्यकांत शेळके यांनी काकासाहेब नामदेव भुईगड (रा.धानोरा, ता.फुलंब्री) यांना तळमजल्यात दोन रुम किरायेने दिल्या होत्या. या दोन रुममध्ये किरायेदार काकासाहेब भुईगड हे पत्नी व दोन मुलीसह वास्तव्यास होते. दरम्यान, नवरात्र उत्सवात किरायेदार भुईगड यांनी घरमालक शेळके यांना मी माझ्या मुळगावी धानोरा येथे चाललो असल्याचे सांगितले होते. यानंतर किरायेदार भुईगड हे कुटुंबासह घरातुन निघुन गेले. दरम्यानच्या कालावधीत किरायेदार भुईगड यांच्याकडे एक महिन्याचे भाडे थकीत असल्याने घरमालक शेळके हे किरायेदार भुईगड यांच्या मोबाईलवर अधुन-मधुन संपर्क करुन पैसे मागत होते. थकीत भाडे लवकरच आणुन देण्याचे आश्वासन किरायेदार भुईगड हा घरमालक शेळके यांना देत होता.

घराच्या किचनमध्ये मिठात पुरलेला मृतदेह सापडला
थकीत घरभाड्यासाठी सतत पाठपुरावा करुनही किरायेदार भुईगड हा प्रतिसाद देत नसल्याने घरमालक शेळके यांनी आज बुधवारी भुईगड यांना संपर्क केला होता. मात्र किरायेदार भुईगड याचा मोबाईल बंद असल्याने तसेच थकीत भाडे देण्यास तो टाळाटाळ करीत असल्याने घरामलक शेळके यांनी सकाळी ९.३० वाजता भुईगड याच्या रुमचे कुलुप तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर घरमालक शेळके यांना घरातील गृहपयोगी साहित्य गायब असल्याचे दिसून आले. घराची पाहणी करीत असतांना घरमालक शेळके यांना किचन ओट्याखाली  खोदकाम करुन तो सिमेंट-वाळूने बंद केलेला तसेच त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड व लिंबु ठेवलेले दिसून आले. कुतुहल म्हणून घरमालक शेळके यांनी शेंदूर लावलेले दगड हटवून किचन ओट्याखाली टिकाव व फावड्याने खोदकाम सुरु केले. खोदकाम सुरु करतांना एका चादरीत मिठात गुंडाळलेला  कुजलेला मृतदेह मिळून आल्याने घरमालक शेळके यांची बोबडी उलटली. घरात मिठात पुरलेला मृतदेह मिळाल्याने घाबरलेल्या घरमालक शेळके यांनी या घटनेची माहिती वाळूज पोलिसांना दिली.

ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिºहे,

सहा.पोलिस आयुक्त अशोक थोरात,पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहा.फौजदार सखाराम दिलवाले, पोकॉ.गणेश लक्कस आदींनी घटनास्थळ गाठुन किचन रुममध्ये कुजलेला व केवळ सांगाडा असलेल्या मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने तो मृतदेह महिलेचा की पुरुषाचा या विषयी गुढ कायम आहे. हा मृतदेह शवविच्देनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


घरातील किचन रुममध्ये मिठात पुरलेला मृतदेह मिळून आल्याने तसेच किरायेदार हा कुटुंबासह तीन महिन्यापासून गायब असल्याने पोलिसांनी किरायेदार भुईगड याच्यावर संशय व्यक्त केला आहे. कुटुंबासह फरार असलेल्या किरायेदार भुईगड याच्या शोधासाठी वाळूज पोलिस ठाण्याचे पथक त्याच्या मुळगावी रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

…..———…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!