July 20, 2024
Home » धक्कादायक ! प्रसिध्द ‘टिकटॉक’ स्टार संतोष मुंडे दुर्दैवी मृत्यू

न्युज मराठवाडा
टिक टॉक या सोशल मीडियावर स्टार म्हणून प्रसिद्ध असेलला संतोष मुंडे व त्याचा सहकारी बाबुराव मुंडे ह्या दोघांचा विजेचा करंट बसल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोगलवाडी येथे आज (दि. 13 मंगळवारी) सायंकाळ च्या वेळेला साडेसहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुखः व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे याने टिक टॉकच्या माध्यमातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोवर असून त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. घटनेची नोंद धारुर पोलिसांत केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!