July 18, 2024
Home » सतत वीजपुरवठा खंडित; त्रस्त नागरिकांचे महावितरणला निवेदन..

वाळूज : ग्राहकांच्या संख्येच्या तुलनेत विद्युत डीपीची क्षमता अत्यंत कमी असल्याने तिसगाव येथील स्वामी समर्थ कॉलनीत वारंवार वीज खंडित होतो. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सतत महावितरणकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतकडे धाव घेत उपसरपंचाच्या उपस्थितीत पुन्हा सोमवारी महावितरणला निवेदन देत विद्युत डीपीची क्षमता वाढवण्याची मागणी केली आहे.

तिसगाव येथील स्वामी समर्थ कॉलनी गट नंबर 217 या परिसरात जवळपास 150 घरांची नागरी वस्ती आहे. येथील विद्युत पुरवठा करणारी विद्युत डीपी कमी क्षमतेची असल्याने ती सतत खराब होते. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी विद्युत उपकरणे खराब होत आहेत. याबाबत त्रस्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तक्रार केली होती. येथील ग्राहक नियमित विद्युत देय्यक भरून सुध्दा विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. या ठिकाणी घरांच्या वापराच्या तुलनेत विद्युत डिपी मधील क्षमता कमी असल्यामुळे डिपी मधील ऑईल बाहेर फेकत आल्यामुळे वारंवार विद्युत परवठा खंडीत होत आहे. या ठिकाणी लवकरात लवकर जास्त क्षमतेची डिपी टाकुन ही कायमस्वरूपी समस्या सोडवावे या संदर्भात नागेश कुठारे-उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.12) शिष्टमंडळासह सहाय्यक आभियंती सचिन उकांडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नागेश कुठारे, सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, हनुमंत जरांगे, लक्ष्मण यमगर, भाऊसाहेब थोरे, एकनाथ शहाणे, केशव जाधव, नाना जाधव, संभाजी पवार, जयश्री जरांगे, अरुणा जाधव, प्रियंका आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!