July 23, 2024
Home » लग्न घरी सव्वाचार लाखाची चोरी करणारा; पोलिसांच्या ताब्यात.

औरंगाबाद : क्रांतीचौक पोलिस ठाण्याचा हद्दीमध्ये लग्न घरी रोख रखमेसह सव्वाचार लाखाचे दागिने दिनक 10 डिसेंबर रोजी लांपास केले होते चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा समांतर तपास करत असतांना औरंगाबाद गुन्हे शाखेने आरोपीला नासिक येथून ताब्यात घेऊन सव्वाचार लाखाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला आहे. ही कारवाई दि 11 डिसेंबर रोजी करण्यात आली.

पोलिसानी दिलेलल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे यांनी स्टापसह महालक्ष्मी चाळ, नाशिक येथे जावुन आरोपीचा शोध घेतला. आरोपी अक्षय उर्फ आझाद पिता रांजेद्र
बिघानिया वय 27 वर्ष रा. महालक्ष्मीचाळ, दारका, नाशिक यास ताब्यात घेवुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील मुद्देमाल घरातील कपाटात ठेवला असल्याचे सांगितले. सदर आरोपीचे घरझडती दरम्यान 2,80,000 चलनी नोटा, 75,250 रु कि. एक नेकलेस 16,100 रु कि.चे दोन कानातले टॉप्स 8850 रु.कि.चे एक गळ्यातीळ ओम पत्ता
35,300 रू.कि. ‘चे, एक मंगळसुत्राचे पेंडट्‌ असे एकूण 4,15,500 रुपये किंमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त अपर्णा
गिते, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल दुमे, पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव
यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/मनोज शिंदे, पोह/चंद्रकांत गवळी, पोना/ भगवान शिलोटे, पोअं/
रविंद्र खरात, पोअं/ विशाल पाटील, पोअं/ नितीन देशमुख, चापोना/ज्ञानेश्वर पवार यांनी केली
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!