July 25, 2024
Home » रक्षकच भक्षक झाले तर !पोलिस अंमलदारानेच चोरली लाखोंची सोनसाखळी

न्यूज मराठवाडा :

औरंगाबाद : धार्मिक यात्रेवरून परतताना विमानतळावर कस्टम अधिकारी विनापावती असणाऱ्या सोनसाखळीबाबत विचारणा करतील, असे सांगून पोलिस अंमलदाराने सहा लाख रुपयांची सोनसाखळी काढून घेतली. मात्र, ती परत न देता, चेन घेतलीच नाही, असा पवित्रा घेतल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिस अंमलदार शेख राजेक शेख अजिम यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टुर्स अँड ट्रॅव्हलचे रफिक करीम खान (वय ४२, रा. युनूस कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे. उमरा येथे गेलेल्या काझी सुल्तानुद्दीन यांच्यामार्फत खान यांनी सोनसाखळी खरेदी करून आणवली होती. मात्र, विमानतळावर राजेक खान यांनी काझी यांना चेन स्मगलिंगची असल्याची भीती घालून चेन स्वत:कडे घेतली होती.

……………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!