July 26, 2024
Home » जुन्या वादातून कोयत्याने वार करत एकाला जबर मारहाण; वाळूज महानगरातील घटना

वाळूज : जुन्या वादातून तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना वाळूज महानगरातील तिरंगाचौकालगत घडली आहे हि घटना आज दिनांक 10 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान घडली. जखमीला घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.

पवन मारोती हाके 27 रा म्हाडा कॉलनी वाळूज महानगर असे जखमी तरुणाचे नाव असून भूषण खैरनार बजाजनगर असे आरोपीचे नाव आहे. खैरनार हा रिक्षाचालक असून जखमी पवन हा हॉटेल चालक आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पवन हा तिरंगा चौकातून मोरे चौकाकडे येत असतांना धरम काटाजवळील पुलाजवळ येताच आरोपीने MH20AT7463 रिक्षाने पवनच्या दुचाकीला मागून धडक दिली.

धडकेत पवन हा खाली पडताच आरोपीने कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली, जीव वाचवण्यासाठी पवन हा तिरंगाचौकाकडे धावत गेले.

जखमी पवन हाके

नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपी रिक्षाचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!