July 21, 2024
Home » शहरी विधार्थ्यांच एक खेड गावं…

औरंगाबाद : कर्मवीर श्री शंकर सिंग नाईक हायस्कूल व प्राथमिक विद्यालय मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ग्रामजीवनाची अनुभूती घेतली. याप्रसंगी इयत्ता बालवर्ग ते दहावी सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने भाग घेऊन आपापल्या वर्गाची झोपडी बनवली. आणि गाव वसवले, या गावांमध्ये लोहार ,कुंभार, कासार, न्हावी, गवळी, वाणी, भाजीवाले, शिंपी,फुगेवाले, चहावाला, असे अठरापगड जातीचे विविध व्यवसाय विद्यार्थ्यांनी प्रशालेत साकारले अशाप्रकारे सर्व व्यवसायांचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. त्याचबरोबर ग्रामजीवन कसे असते ,गावातील शाळा कशा असतात, ग्रामपंचायत ,आरोग्य केंद्र, इत्यादी विविध कार्यालय व त्याचे कामकाज याचा देखील प्रात्यक्षिकातून अनुभव घेतला .विध्यार्थी शहरात तर जीवन जगतच आहेच परंतु ग्रामजीवन काय असते हे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रसंगीअनुभवले. ही संकल्पना प्रशालेतील कलाशिक्षक राजेश निंबेकर सर यांनी मांडली होती, तसेच या कल्पनेला प्रशालेतील बंगले सर, सावंत सर, त्रिभुवन सर, इंगळे सर, भोईसर, जोगे सर ,शेळके सर, कचकुरे मॅडम ,काथार मॅडम, स्वाती मॅडम, रोहिणी मॅडम, पाटील मॅडम,गजभार मॅडम व शाळेतील गोरे सर ,संजू मामा, संतोष मामा, मनोहर मामा, या सर्वांनी भरभरून सहकार्य केले.

गवळण ,दिंडी, भजन, भारुड इत्यादी लोककलांचे विद्यार्थ्यांनी,सादरीकरण केले, आणि विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला. याप्रसंगी गावामध्ये गाय, म्हैस ,शेळ्या, कोंबड्या, कबूतर ,ससे, मांजर, मांजर, कुत्रे, वासरू, इत्यादी प्राण्यांना प्रत्यक्ष शाळेत आणून या ग्राम देखाव्याची शोभा वाढवली,
त्याचबरोबर विविध वेशभूषेत जसे भंतेजी, वासुदेव, मौलाना ,भटजी, फकीर, पोतराज, इत्यादी पेहरावत बाल विद्यार्थी सहभागी झाले.

व संपूर्ण ग्राम जीवनाचा आनंद शिक्षक, विद्यार्थी, आणि पालक यांनी लुटला. याप्रसंगी स्वतः तयार केलेले भोजन, ज्यामध्ये बाजरीचीभाकरी तांदळाची भाकरी,ज्वारीची भाकरी, कळणीचीभाकरी, त्याचबरोबर वांग्याची भाजी, भात,ठेचा, सालड, यासोबतच शिरा चवळीची उसळ, याचा आस्वाद घेतला, या सर्व संकल्पनेच्या सादरीकरणासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुलभा नालमवार आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नलमवार यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जवाहर पोलीस स्टेशनचे पीआय माननीय संतोषजी पाटील सर, त्याचबरोबर इस्कॉन प्रतिनिधी अनिल गायकवाड यांचा सत्कार करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

———-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!