July 22, 2024
Home » अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; १८ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त…

पैठण : सोलापूर – धुळे रोडवर पाचोड पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर कडून औरंगाबादकडे येतांना आडगाव जावळे शिवारात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप एम. एच. ४० सी. डी. २६५७ या गाडीवर स्थानिक गुन्हे शाखेने  कारवाई करून १८ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई दि ८ रोजी सकाळी ५ः३० वाजेच्या सुमारास करण्यात अली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ७ रोजी पोलीस निरिक्षक रेंगे यांना माहिती दिली मिळाली  कि, सोलापुर ते धुळे रोडवर वाहन बोलेरो पिकअप क्रमांक एम. एच. ४० सी. डी. २६५७ या वाहनामध्ये सोलापुर कडुन औरंगाबादकडे रात्रीच्या वेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली सुगंधीत तंबाखु व पान मसाला येणार आहे. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे  शाखेकडून सापाला रचत दिनांक ०८ रोजी सकाळी ०५.३० वाजता सोलापुर धुळे रोडवर मौजे आडगाव जावळे शिवारात रोडवर एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच. ४० सी.डी. २६५७ हि पाचोड कडुन औरंगाबाद कडे येतांना पोलिसांना दिसली, त्यास पोलिसांनी  थांबण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने वाहन रोडवर उभे करुन तो अंधारात शेतात पळुन गेला, त्याने सोडुन दिलेल्या वाहनाची  पाहणी केली असता त्यामध्ये हिरा पान मलाला  ६० गोण्या, रॉयल ७१७ सुगंधीत तंबाखुच्या ३० गोण्या व बोलेरो पिकअप गाडी असा एकुण १७ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला सदरची कामगिरी मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उप निरीक्षक विजय जाधव, पो.हे.कॉ/ लहु थोटे, पो.हे.कॉ. श्रीमंत भालेराव, पोना / नदिम शेख, पोकॉ/ राहुल गायकवाड यांनी केली आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!