July 22, 2024
Home » डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन

औरंगाबाद : प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेस्टेशन परिसरात लोकनेता रामदास आठवले आठवले प्रतिष्ठाण व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनेता रामदास आठवले प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रविण नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सुखदेव सोनवणे, कार्याध्यक्ष जे. के. आमराव, प्रसिद्धीप्रमुख संजय निकम यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहर अध्यक्ष नागराज गायकवाड, युवा शहर अध्यक्ष राकेश पंडित, मराठवाडा सचिव दिलिप पाडमुख, जिल्हा कार्याध्यक्ष शरद किर्तीकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश दाभाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चैत्यभूमीकडे जाणार्‍या पंचक्रोशीतील हजारो भीम अनुयायांनी याचा लाभ घेतला. यावेळी औरंगाबाद (प.) तालुकाध्यक्ष किशोर साळवे, खुशालराव बनसोडे, वाळूज महानगर अध्यक्ष संजय निकम, पश्चिम युवा अध्यक्ष चेतन सोनवणे, तालुका उप अध्यक्ष अशोक मकासरे, गौतम मोरे, सूर्या पठारे, प्रवीण तुपे व प्रज्ञा खुशालराव बनसोडे , अंजना सुखदेव सोनवणे, निर्मला भगवान राव वाघ,नंदा कटारे, उज्वला रवींद्र कदम, संगीता प्रकाश सोनवणे,सीमा रमेश वाघमारे, रमाबाई तायडे, अरुणा गायकवाड सुचित्रा बगाडे, ज्योती माधव वाघमारे,सुनीता गोंडाने,पल्लवी चेतन सोनवणे,वैशाली मोरे,दीपाली मंगेश इंगळे, सुखदेव भाऊ सोनवणे , सुपजी वानखेडे, सुनील मुनेश्वर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!