July 18, 2024
Home » मोठी चोरी: सात तोळे सोन्यासह रोख पावणेपाच लाखाची चोरी…

वाळूज : तिसगाव परिसरातील म्हाडा कॉलनी जवळील एका वस्तीवर चोरट्यांनी सात तोळे सोन्यासह पावणेपाच लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना आज दि 7 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

देवा वीरा महेर 36 हे तिसगाव परिसरातील म्हाडा कॉलनी येथील कुटुंबासह वस्तीवर राहतात, घरामध्ये लोखंडी पेटीमध्ये ३.५० तोळे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५० टोळ्यांची सोन्याची चैन , ४.२५ ग्राम चांदीचे कडे, नुकतीच विकलेल्या जुन्या गाडीचे रोख २.५० लाख रुपये, विकलेल्या दोन म्हशीचे १ लाख रु , दुधाचे १ लाख रु व घरात ठेवलेले २५ हजार रु. असे एकूण ४ लाख ७५ हजार रुपये त्या पेटीमध्ये ठेवलेले होते, दरम्यान भागुबाई महेर व त्यांची दोन मुले हे घरात झोपेत असतांना अचानक पेटीची कडी वाजल्याचा आवाज आला. उठल्यानंतर त्यांना चोरटे पेटी घेऊन जातांना दिसले, भागुबाई यांनी आरडाओरड केली आणि वस्तीवर पतीसह इतर नातेवाई जागी होऊन त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांकडे चारचाकी असून ते औरंगाबाद नगर रोडकडे पसार झाल्याचे देवा महेर यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरसत खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्री घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घ्यावा असे देवा महेर यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!