July 26, 2024
Home » परफेक्ट गेम आयशर रिकामी तरी ही सुमारे 28 लाखाचा मध्ये साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नासिक प्रतिनिधी

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी दि.5 नोव्हेंबर रोजी नाशिक कळवण रोडवरील अकराळे फाटा येथे आयशर गाडी क्रमांक एम एच 48 ए वाय 3663 परफेक्ट सापळा रचून चेक केले असता गाडी मागे संपूर्ण चेक केले परंतु रिकामी असल्याचे निष्पन्न झाले अधिकाऱ्यांच्या तीक्ष्णबुद्धीने गाडीची केबिन चेक केली तर केबिन त्यात एक छुपा कप्पा आढळून आला व विशेष म्हणजे गोवा राज्यातील 27,70,720 किंमतीचा मद्य साठा आढळून आला.


यामध्ये आरोपी हंसराजभाई मोहनभाई ठाकूर रा. पलसान, सुरत यास ताब्यात घेतले. तसेच इतर आरोपी व वाहन मालक फरार असून त्यांचा तपास चालू आहे.
सदरची कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त अर्जुन ओहळ व अधीक्षक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एस के शस्त्रबुद्धे एम बी सोनार, आर एम डमरे, डी एन आव्हाड, सातपुते, कुवर, व वाहन चालक वाईकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. ह्या कारवाईत दिंडोरी व कारंजाळी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहस्रबुद्धे कळवण विभाग हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!